जव्हार तालुक्याची माहिती..
Jawhar taluka म्हणजेच निसर्गासोबतच अतिशय जुना इतिहासाचा वारसा लाभलेला तालुका, महाराष्ट्रातील आपल्या पालघर जिल्यातील Jawhar ला पालघर जिल्ह्यातील jawhar Hill Station किंवा पालघर जिल्ह्याचे ‘महाबळेश्वर’ असेही संबोधले जाते. जव्हार हे एक ठिकाण आपल्या पालघर जिल्यातील निसर्गाच्या सौंदर्याचे सर्वांत उत्तम उदाहरण आहे तसेच इथे अनेक मानवनिर्मित आकर्षक ठिकाणे देखील आहेत. जव्हारमधे असंख्य नयनरम्य ठिकाणे आहेत ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेले आणि मुंबईपासून सुमारे 165 व पालघर पासून सुमारे 68 किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी असलेले आल्हाददायक हवामान आणि सुंदर निसर्ग सौंदर्य लाभले असल्याने वर्णन करण्यासाठी शब्दांच्या पलीकडे आहे. जव्हारला अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत जे आपल्याला 14 व्या शतकाच्या इतिहासात घेऊन जातात.जव्हार करांनी आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. जव्हार हे वारली चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. येथील तारपा ...